Home गुन्हेगारी मोरेवस्तीतील अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी — स्वराज्य पक्षाकडून चिखली पोलिसांना निवेदन

मोरेवस्तीतील अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी — स्वराज्य पक्षाकडून चिखली पोलिसांना निवेदन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड (दि. १७ जुलै २०२५): मोरेवस्ती, चिखली परिसरात वाढत चाललेल्या हातभट्टी दारू विक्री व अनधिकृत हॉटेलमधील अवैध दारू व्यवहारांविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने चिखली पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. या अवैध व्यवसायामुळे परिसरातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे, अशी गंभीर तक्रार यावेळी करण्यात आली.

स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “मोरेवस्ती परिसरात दिवसेंदिवस अवैध दारू विक्रीची प्रकरणं वाढत असून, अनेक हॉटेलांतून आणि गल्ल्यांत खुलेआम हातभट्टी दारू विक्री होत आहे. त्यामुळे महिलांना, मुलींना आणि कुटुंबांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण झाला आहे.”

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरेल.

या निवेदनप्रसंगी उपस्थित असलेली नेतेमंडळी:

banner

विजय जरे (शहराध्यक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष)

विद्याताई शेवाळे

पूनम मॅडम महाडिक

प्रतिभाताई काळे

योगेश सोनावणे

समाधान जाधव

सचिन शिंदे

किशोर तेलंग

स्वप्नील शेंडगे

रंगनाथ भंडारी

यश कारले

सागर शेंडगे

या सर्वांनी एकत्रितपणे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा उभारल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांनी या निवेदनाची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?