Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी महोत्सव! – बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी महोत्सव! – बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. १९ जुलै २०२५:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा उपक्रम उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा घेतला जात असून, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत संत तुकारामनगर, पिंपरीतील भारतीय जैन संघटना स्कूल, YCM हॉस्पिटल समोर या ठिकाणी होणार आहे.

५० हून अधिक नामांकित कंपन्या | विविध क्षेत्रांतून संधी

शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकाराने या नोकरी मेळाव्यात फार्मा, एफएमसीजी, बँकींग, आयटी, इन्शुरन्स, रिअल इस्टेट, हेल्थकेअर, ॲग्रीटेक आदी क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.

पात्रता: इयत्ता ५वी पास ते पदवीधर, ITI, डिप्लोमा व डिग्रीधारक यांना सहभागी होता येणार आहे.

banner

नोंदणीसाठी संकेतस्थळ:

👉 ncp.jobfairindia.in
👉 बारकोड स्कॅन करूनही नोंदणी करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9657580620 / 9579683268

🗣️ “संधीचे सोने करा” – योगेश बहल यांचे आवाहन

या उपक्रमाबाबत माहिती देताना बहल म्हणाले, “तरुणाईला रोजगाराच्या संधी देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. या रोजगार महोत्सवातून बेरोजगारांना करिअर घडवण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. सर्वांनी सहभागी व्हा.”

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?