आळेफाटा : आळेफाटा येथून जवळच असलेल्या विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,राजूरी येथे लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शानदारपणे पार पडला यावेळी डॉ.श्नीपाल सबनीस,सुदाम भोरे, मुकूंद आवटे, महेंद्र भारती, पुरुषोत्तम सदाफुले मामा, शिवाजीराव चाळक ,दिपक आवटे , ललिता सबनीस, बबनराव हाडवळे, प्रियाताई हाडवळे, प्रदीप डुंबरे, ज्ञानेश्वर शेळके, आणि वल्लभ शेळके उपस्थित होते, त्याच बरोबर पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती महत्वपूर्ण होती. ज्ञानाच्या मंदिरात जीवनाचा आलेख उंचावण्याचे संस्कार शाळेमधूनच होत असतात हा धागा पकडून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र भारती हे विविध क्षेत्रात निष्ठा आणि प्रामाणिकपणे समाजात एकतेचे प्रतिक निर्माण करण्यासाठी सातत्याने धडपड करणाऱ्या व्यक्तीमत्वाच्या कार्याचा सन्मान करत आले आहेत.
तुटपुंज्या पगारात घर खर्च भागवून कवितेचा प्रपंचरुपी जागर इच्छा शक्तीच्या जोरावर काव्यात्मा साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे आजवर करत आले आहेत.
आधार कवितेचा सन्मान विचारांचा
मनी उर्जेचा स्त्रोत निर्माण करत असतो
ही भूमिका समाजात प्रेमाचे प्रतिनिधीत्व करणारी असल्याने कवी आत्माराम गोविंदराव हारे हे कविता जगणारे व्यक्तिमत्त्व आहे अशी पुष्टी अध्यक्ष सुदाम भोरे यांनी जोडली .
नशा दारुची नको
नशा कवितेची करा
अंधाराला नको
प्रकाशाला सलाम करा
अशा विचारांचा जागर करणारा अवलिया म्हणजे आत्माराम हारे माणसाला जोडणारी नाती काव्य संमेलनाच्या माध्यमातून निर्माण करत आहे म्हणूनच लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानने “लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कारा”ने कवी आत्माराम गोविंदराव हारे यांना डाॅ.श्नीपाल सबनीस यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
तेव्हा मनोगतात हारे म्हणाले, “व्यासपीठावरील सर्व मान्यवर आकाशाला गवसणी घालणारे असल्याने त्यांच्या सोबत माझ्या सारख्या सर्व सामान्य कवीचा सन्मान झाला हिच गोष्ट मला अधिक नाविन्यपूर्ण वाटते.”ज्यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण झाले तेव्हा प्रसिद्ध साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले ,महान विचारवंताच्या विचारांची बेरीज झाली पाहिजे तरच अवती भोवतीचा अंधार दूर होईल अशी भूमिका मांडली.कवी आत्माराम गोविंदराव हारे यांना लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .