पिंपरी प्रतिनिधी (दिनांक ८ ऑक्टोंबर २०२६) माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून जागृत नागरिक महासंघाच्या वतीने संघातील सभासद, जेष्ठ नागरिक व शासकीय कर्मचारी यांना माहिती अधिकार कायदा २००५ या कायद्याचे चे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्व. तानाजीराव शितोळे (सरकार) उद्यान जुनी सांगवी येथील सभागृहात संपन्न झाले. नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी झाला महानगरपालिकेच्या स्व इंदिरा गांधी प्रसुतिग्रह रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती सागळे यांनी त्यांच्या कार्यालयात माहिती अधिकार बाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आपण केलेल्या कामाची संपूर्ण माहिती वेबसाईटवर, हार्ड कॉपी मध्ये तसेच ठळकपणे फलक द्वारे प्रदर्शित केलेली आहे असे सांगितले तसेच नगरसेविका तृप्ती कांबळे यांनी माहिती अधिकाराबाबत सकारात्मक वापर केल्यामुळे नागरिकांना आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना नक्कीच फायदा होतो आणि असे उपक्रम राबवल्याबद्दल जागृत नागरिक महासंघाचे कौतुक केले अध्यक्ष श्री नितीन यादव यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर गैरवापर व फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले माहिती अधिकार कायदा अतिशय साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितला माहिती अधिकार कायद्याचा वापर फक्त व्यापक समाजहीसाठी व लोकहितांसाठीच केला पाहिजे यावर भर दिला त्यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष नरेंद्र वाडते, सचिव कमलाकर कुलकर्णी, कार्यकारी सदस्य प्रकाश पाटील, तसेच प्रकाश गडवे, राजश्री शिर्के , मच्छिंद्र कदम, दत्तात्रय देवकर, सुनील गुजर, किशोर देशपांडे, सतीश जाधव, राजेंद्र कदम,श्री.अरविंद पांचाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक आणि शासकीय कर्मचारी तसेच स्व. इंदिरा गांधी प्रसतीगृहचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नरेंद्र वाडते आणि प्रकाश पाटील यांनी केले तसेच राजश्री शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
जागृत नागरिक महा संघाच्या वतीने माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण संपन्न
माहिती अधिकार कायदा २००५ महत्व वशीत करणारे प्रशिक्षण जुनी सांगवी येथे करण्यात आले
295