Home शिरूरमहाराष्ट्र माजी सैनिक सुभेदार मेजर प्रभाकर सोनवणे यांना ‘योद्धा सेवा सन्मान’.

माजी सैनिक सुभेदार मेजर प्रभाकर सोनवणे यांना ‘योद्धा सेवा सन्मान’.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी ( दिनांक २६ सप्टेंबर २०२६) पुणे येथील माजी सैनिक विकास संघटना खराडी वडगाव शेरी संघटनेचे सचिव सुभेदार मेजर प्रभाकर सोनवणे (निवृत्त) यांना राष्ट्रनिर्माणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतीय लष्कराचा ‘योद्धा सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान थल सेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवा, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य आणि राष्ट्रसेवेतील योगदानाची दखल घेत त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles