Home शिरूरमहाराष्ट्र आळंदी पंचक्रोशीतील गणेशोत्सवात डीजेस बंदी इंद्रायणी नदीत श्रींचे मूर्ती विसर्जनास बंदी कायम

आळंदी पंचक्रोशीतील गणेशोत्सवात डीजेस बंदी इंद्रायणी नदीत श्रींचे मूर्ती विसर्जनास बंदी कायम

गणेश मंडळ पदाधिकारी - पोलिस अधिकारी बैठकीत निर्णय 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी (दिनांक १ सप्टेंबर २०२६) आळंदी पोलिस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सवाचे पार्श्व भूमीवर आळंदी पोलिस स्टेशन मध्ये हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साही वातावरणात झाली.

गणेशोत्सव उत्साही शांततेत, शिस्त आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी आळंदी पोलिस स्टेशन प्रशासनाने मंडळांना विविध सूचना आणि उत्सव शांततेत साजरा करण्यास सूचना दिल्या.

या बैठकीस पिंपरी पोलिस आयुक्तालय अंतर्गत चाकण पोलिस परिमंडळ तीनचे सहायक पोलिस आयुक्त योगेश रांजणकर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.एस.नरके, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक तसेच शांतता समिती सदस्य डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, उत्तम गोगावले, आनंद मुंगसे, सचिन घुंडरे पाटील, पांडुरंग गावडे, सुरेश भोसले, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, ॲड सोहेल शेख, नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे, महेश गोरे, सचिन घुंडरे, पोलिस पाटील युवराज वहीले, निसार सय्यद, ज्ञानेश्वर गुळुंजकर, सुदीप गरुड, गणेश मंडळांचे पदाधिकारी , शांतता कमिटी सदस्य उपस्थित पदाधिकारी यांनी ही मार्गदर्शन केले.

आळंदी पंचक्रोशीतील गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासनाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याने मंडळांचे पदाधिकारी यांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.

banner

उत्सवात डीजेचा वापर करू नये, तसेच मिरवणुकीत लेझर व प्लाझ्माचा वापर करण्यास बंदी असून मंडळानी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचना निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करीत गणेशोत्सव मंडळांना पोलिस प्रशासन गणेशोत्सव काळात सर्वोतोपरी मदत व सहकार्य करील असे सांगितले. भक्ती मंगलमय उत्साही वातावरणात मात्र शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी ही पोलिस प्रशासनाचे आवाहन प्रतिसाद देत संमती दिलीं.

या वेळी प्रशासनाने सूचना केल्या. या मध्ये गणेश दर्शन महिला व पुरुष स्वतंत्र रांगा, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात यावी. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग प्रारंभ चाकण चौक, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता येथून असेल, चावडी चौकातून नगरपरिषद चौक असा राहील. मात्र वेळोवेळी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना आणि पूर्व परवानगी घेऊन मिरवणुका होतील.

या वेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी ही मनोगत व्यक्त केले. पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी बैठकीस सुसंवाद साधून यशस्वी संयोजन केले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles