Home शिरूरमहाराष्ट्र नेपाळ येथे महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदत*

नेपाळ येथे महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदत*

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक २७ ऑगस्ट २०२६) नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत.

या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:

🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

banner

पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन* –

जर पुणे जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांनी केले आहे.

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,*

*जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

*02026123371/1077

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles