Home शिरूरमहाराष्ट्र निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व cry यांच्या सहकार्याने कातकरवस्तीतील कचरा साफसफाईचा निर्धार शुभांगी गावडे तृप्ती जाधव

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व cry यांच्या सहकार्याने कातकरवस्तीतील कचरा साफसफाईचा निर्धार शुभांगी गावडे तृप्ती जाधव

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व cry यांच्या सहकार्याने कातकरवस्तीतील कचरा साफसफाईचा निर्धार शुभांगी गावडे तृप्ती जाधव

 

चाकण प्रतिनिधी (दिनांक २१ ऑक्टोंबर २०२६) कातकरवस्ती परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व cry आणि कातकरवस्तीतील नागरिकांनी पुढाकार घेत कचरा साफसफाई करण्याचा निर्धार केला. परिसरातील अस्वच्छता, रस्त्यावर पडणारा कचरा तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

 

banner

या स्वच्छता मोहिमेत निर्माण संस्थेच्या शुभांगी गावडे व तृप्ती जाधव तसेच कातकरवस्ती मधील कार्यकर्ते शिवाजी मुकणे, गीताली भोईर साक्षी देवकर व पालक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यावेळी वस्तीतील महिला व पुरुषांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच घरातील कचरा परिसरात न टाकता तो योग्य ठिकाणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

“स्वच्छ परिसर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,”

 

या संदेशातून पालकांनी नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि इतर नागरिकांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करण्याचा निर्धार केला. या उपक्रमामुळे वस्तीतील नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली असून कातकरवस्ती परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles