Home शिरूरमहाराष्ट्र ४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल*

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल*

*डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा*

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दिनांक ४ ऑगस्ट २०२६) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ४ ऑगस्ट २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या कालावधीत ५५६ कोटी ८४ लाख ३४ हजार ७२९ रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. कर संकलन विभागाच्या विविध सवलत योजनांना मिळकतधारकांनी चांगला प्रतिसाद दिला असून अद्यापपर्यंत ज्या मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो विलंब न करता भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

यंदा कर भरण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन सुविधेला मोठी पसंती दिली आहे. महापालिकेच्या ५५६ कोटीचा मालमत्ता कर वसूल झाला असून, त्यापैकी ५१२ कोटी ७७ लाख ९८ हजार ७०८ रुपये ऑनलाइन माध्यमातून, तर ४४ कोटी ६ लाख ३६ हजार २१ रुपये ऑफलाइन माध्यमातून जमा झाले आहेत. ऑफलाइन वसुलीत रोखीद्वारे २३ कोटी ८५ लाख ७० हजार १२२ रुपये, धनादेशाद्वारे १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ५७२ रुपये आणि डिमांड ड्राफ्टद्वारे १ कोटी ७६ लाख ९८ हजार ३२७ रुपये जमा झाले आहेत.

 

banner

शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्व मालमत्ताधारकांना वेळेत कर देयके उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले होते.

 

पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचे वेळेवर संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर भरून विकासकामांप्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन माध्यमातून कर भरण्यास नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा डिजिटल सेवांवरील विश्वासाचे द्योतक आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.

 

महापालिकेच्या विकासकामांना आर्थिक बळ देण्यासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून विकास प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे, ही समाधानाची बाब आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.

चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ४ ऑगस्टपर्यंत ५५६ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित झाला आहे. त्यापैकी ५१२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन माध्यमातून जमा झाली आहे. यावरून नागरिकांचा डिजिटल माध्यमावरील वाढता विश्वास दिसून येतो. ज्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरला नाही, तो त्यांनी तात्काळ भरावा.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles