Home शिरूरमहाराष्ट्र आषाढी एकादशी दिनी थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्ट तर्फे पांडुरंगरायांची महापूजा 

आषाढी एकादशी दिनी थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्ट तर्फे पांडुरंगरायांची महापूजा 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी (दिनांक २५ जुलै २०२६)देवशयनी आषाढी एकादशी निमित्त वडमुखवाडी येथील माऊलींचे विसाव्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी दिनी ट्रस्ट तर्फे पांडुरंगरायांची महापूजा हरिनाम गजरात करण्यात आली.

या वेळी श्री पांडुरंगराय, रुक्मिणीमाता श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तींना दही, दूध, मध, अत्तर लावून श्रींची पूजा, अभिषेक, पुष्पहार अर्पण करून महापूजा थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, ॲड. मयूर तापकीर, सुनिता तापकीर, कीर्ती तापकीर आणि समस्त तापकीर परिवार यांच्या वतीने महापूजा, आरती करण्यात आली.

हरिनाम गजरात श्रींना फराळाचा महानैवेद्य यावेळी वाढविण्यात आला. या वेळी मंगेश गराडे, राजेंद्र नाणेकर, साहेबराव काशीद, शिवाजी तळेकर, देविदास पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी भाविकांना ॲड. विष्णू तापकीर यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी पहाटे काकडा, भजन, सकाळी दहा ते बारा हभप सुभाष महाराज लबडे यांची कीर्तन सेवा उत्साहात झाली. मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात श्रींचे दर्शना साठी रांगा लावून दर्शन घेतले. दुपारी महिलांची भजन सेवा उत्साहात झाली. हरिजागरसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या वेळी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles