Home शिरूरमहाराष्ट्र मोशी प्राधिकरण परिसरात वाढत्या चोऱ्या , घरफोड्या व गुन्हेगारी घटनांबाबत तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा माहिती अधिकार संघटनेचा इशारा

मोशी प्राधिकरण परिसरात वाढत्या चोऱ्या , घरफोड्या व गुन्हेगारी घटनांबाबत तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा माहिती अधिकार संघटनेचा इशारा

पिंपरी चिंचवड मोशी प्राधिकरण चोरट्यांची दहशत

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक १५ जून २०२६) संत नगर मोशी प्राधिकरण परिसरामध्ये वाढत्या चोऱ्या अनेक दिवसापासून चोरट्यांचे दहशत निर्माण झाली आहे.संतनगर, मोशी प्राधिकरण परिसरात वाढत्या चोऱ्या , घरफोड्या व गुन्हेगारी घटनांबाबत तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना उपाययोजना करण्याबाबत जागृत नागरिक महासंघातर्फे सविनय निवेदन सादर करण्यात आला आहे दिनांक १४/०६/२०२६ रोजी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी साई पार्क हाऊसिंग सोसायटी सेक्टर ९ मोशी प्राधिकरण पुणे येथे अत्यंत गंभीर स्वरूपाची घरफोडीची घटना घडली आहे.

सदर घटनेत तीन अज्ञात चोरटे धारदार शस्त्रे तसेच मोठ्या आकाराचे कटिंग टूल घेऊन सोसायटी परिसरात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले आहेत. विशेष म्हणजे, हे चोरटे मुख्य प्रवेशद्वारावरून उड्या मारून सोसायटीच्या आत आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

चोरट्यांनी प्रथम पहिल्या मजल्यावर (फ्लॅट क्र ६ ) बंद फ्लॅटची पाहणी करून त्यानंतर घरफोडी केली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाले आहे.यापूर्वीही संतनगर, मोशी प्राधिकरण परिसरात अनेक गुन्हेगारी घटना घडलेल्या आहेत.मागील आठवड्यात याच परिसरातील एका अनधिकृत दुकानात चोरी व दुकानफोडीची घटना घडली.आहे मागील महिन्यात साहिल सिद्धी सोसायटीमध्ये बुलेट मोटारसायकल चोरीची घडली होती या परिसरात वारंवार होणाऱ्या चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरील घटनांवरून संतनगर, मोशी प्राधिकरण परिसर हा चोरी व गुन्हेगारी घटनांचा अड्डा बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

banner

१) संतनगर, मोशी प्राधिकरण परिसरात पोलीस गस्त वाढवून प्रत्येक तासाला नियमित गस्त घालण्यात यावी.

२) रात्रीच्या वेळी विशेष पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात यावी.

३) परिसरातील सर्व सोसायट्यांची सुरक्षा व्यवस्था तपासण्यात यावी.

४) प्रत्येक सोसायटीमध्ये कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा व प्रशिक्षित सुरक्षा रक्षक (वॉचमन) असणे बंधनकारक करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी.

५) सदर घरफोडी प्रकरणाचा तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी.

६) परिसरातील संशयित व्यक्ती, गुन्हेगार व टोळ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे.

७) नागरिकांमध्ये सुरक्षा व जनजागृती अभियान राबविण्यात यावे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने या गंभीर विषयाकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, या सर्व विषयासाठी जागृत नागरिक महासंघाने माननीय पोलीस उपयुक्त प्र. इंगळे साहेब यांना महासंघाने पुढाकार घेऊन या सर्व विषयाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराव कायदेशीर कारवाई करावी नागरिकांना न्याय मिळावा यासाठी जागृत नागरिक संघाने पुढाकार घेऊन निवेदन देण्यात आले. त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, सदस्य श्री निवास कुलकर्णी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा राजश्री शिर्के मंगेश देशपांडे, कुलकर्णी साहेब, या सर्वांनी पुढाकार घेऊन आज निवेदन देण्यात आले त्यावेळी इंगळे साहेबांनी लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?