Home शिरूरमहाराष्ट्र कुदळवाडी पवार वस्ती या ठिकाणी अनधिकृत बांधकामावरती केली कारवाई

कुदळवाडी पवार वस्ती या ठिकाणी अनधिकृत बांधकामावरती केली कारवाई

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड (दिनांक ९ जुन २०२६) महानगरपालिकेच्या ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. कड़क पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जवळपास २८००१ चौ. फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

सदर कारवाई मा. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सह शहर अभियंता (बांधकाम परवानगी, विद्युत), उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व क्षेत्रिय अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी) यांसह इतर कार्यकारी अभियंता (विद्युत, स्थापत्य) उपस्थित होते.

या मोहिमेत महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे १२ कार्यकारी अभियंता, ३२ उप अभियंता, १८ कनिष्ठ अभियंता आणि ४२ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) सहभागी झाले होते. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते. कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि जवळपास १५० एम.एस.एफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच २२ पोकलेन, २६ जेसीबी आणि १२० मजुरांच्या सहाय्याने ही बांधकामे हटवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी ४ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

 शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे हे शहरातील नियोजित व शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून अभय दिले जाणार नाही. शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनीही बांधकाम करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच पुढील कार्यवाही करावी.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?