Home सामाजिक महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या शिलेदारांनी भीम अनुयायांची केली अन्न पाणी सेवा.

महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या शिलेदारांनी भीम अनुयायांची केली अन्न पाणी सेवा.

आमदार शंकर जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

| प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड,(दिनांक १४ एप्रिल २०२६) पिंपरी चिंचवड शहरात आज पिंपरी येथे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पिंपरी चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना आज दिनांक १४; एप्रिल पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या अन्न पाणी वाटपात उपस्थित पत्रकारांनी भीम अनुयायांची सेवा केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे यांनी आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले. अन्न पाणी सेवा सुरू असताना दरम्यान आमदार शंकर जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार , भाजप शहराध्यक्ष शत्रुग्न काटे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिवसेना नेते युवराज कोकाटे, कैलास कुटे, दीपक नागरगोजे यांच्यासह विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भीम अनुयायांना अन्न व पाणी वाटप करून शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीम सृष्टी येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी आणि नागरिक येत असतात. त्यांच्या अन्न पाण्याची आणि अल्पोपहराची सोय व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने अन्नपाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भीम अनुयायांसह उपस्थित पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावर दिसले. तत्पूर्वी विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पत्रकारांनी अभिवादन केले.
यावेळी आयोजक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी, डिजिटल मिडिया परिषद अध्यक्षा विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे सदस्य व पदाधिकारी तसेच प्रत्यक्ष सक्रीय पत्रकार महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, संतोष गोतावळे, संभाजी बारबोले, रोहित जाधव, अशोक कोकणे, दत्ता कांबळे, नरेश जीवनाल, हनुमंत रामदासी, सीता जगताप इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?