Home आरोग्य पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करा -अनाधिकृत बांधकामावर कडक कारवाई करा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करा -अनाधिकृत बांधकामावर कडक कारवाई करा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

सार्वजनिक शौचालयांची नियमीतपणे स्वच्छता करून आरोग्य विभागाने सातत्याने आढावा घ्यावा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक १२ एप्रिल २०२६) आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा आरोग्य विभागाने सातत्याने आढावा घ्यावा. सार्वजनिक स्वच्छतेच्या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये. नाल्यांवरील तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे, अडथळे निर्माण करणारी आस्थापने यांच्यावर कडक कारवाई करावी,असे देखील त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दिवंगत महापौर मधूकरराव पवळे सभागृहात नुकतीच आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह अभियंता बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, अण्णा बोदडे, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, नगर सचिव मुकेश कोळप, सहायक आयुक्त तानाजी नरळे, अमित पंडित, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, राजाराम सलगर, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अतुल पाटील, राजाराम सलगर, किशोर ननवरे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध कामांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

banner

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक सजग आणि सक्षम राहणे आवश्यक आहे. नालेसफाईची कामे केवळ पूर्ण करणे नव्हे, तर ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा देणे हे प्राथमिक उद्दिष्ट असावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनते. त्यामुळे अशा बांधकामांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असे स्पष्ट करत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर अनधिकृत नळजोड, ओव्हरहेड वायर, पदपथावरील अतिक्रमण, शहर विद्रूप करणारे होर्डिंग, बॅनर व जाहिराती यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

बैठकीत पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन, तसेच उन्हाळ्यात नागरिकांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांची उपलब्धता यांचा सुद्धा सखोल आढावा घेण्यात आला. विविध विभागांमध्ये समन्वय साधून संभाव्य संकटांना सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण १४५ नाले आणि सुमारे ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. यापैकी आतापर्यंत ४७.३४ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च महिन्याच्या तुलनेत प्रगतीत लक्षणीय वाढ झालेली आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेतल्यास ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाने ६४.३८ टक्के प्रगती साधत आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाने ६३.०० टक्के, ‘फ’ ने ५४.७२ टक्के आणि ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाने ५१.५० टक्के प्रगती साधली आहे. ‘ग’ (४४.११%), ‘ड’ (३९.५५%), ‘ह’ (३२.७२%) आणि ‘क’ (२८.७५%) क्षेत्रीय कार्यालयांमध्येही कामाला गती देण्यात येत असून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. झिरो वेस्ट स्लम, झिरो वेस्ट स्कूल, आर.आर.आर. सेंटर या उपक्रमांद्वारे शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

आनंदनगर येथील ‘शून्य कचरा’ प्रकल्पाचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांचा विस्तार शहरातील इतर भागांमध्येही करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. नागरिकांचा सहभाग वाढवून स्वच्छतेच्या उपक्रमांना अधिक बळ देण्यावरही त्यांनी भर दिला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?