Home राजकीय आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक ११ एप्रिल २०२६) रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक येथे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असे शहराध्यक्ष योगेश बहल बोलत होते की, ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. भारतीय समाजातील महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि ‘सत्यशोधक समाजा’चे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव आहे.

याप्रसंगी ॲड.गोरक्ष लोखंडे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया रचला. जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे कार्य खूप मोठं आहे, अशा या थोर क्रांतीसूर्याला मी विनम्र अभिवादन करतो.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे, नगरसेवविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, शक्रुल्ला पठाण, दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, दिलीप पानसरे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, सरचिटणीस राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, युवक शहर संघटक स्वराज शिंदे, सरचिटणीस राजू चांदणे, गणेश गायकवाड, कुमार कांबळे, सचिन शिंदे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?