Home शिरूरमहाराष्ट्र हजेरी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाची गावकरी भजन सेवेने सांगता

हजेरी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाची गावकरी भजन सेवेने सांगता

ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी आळंदी (३ एप्रिल २०२६) दिवस अलंकापुरीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री हनुमान जन्मोत्सवाची ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम जय घोषासह गावकरी भजन सेवेने मंगलमय वातावरणात सांगता झाली

जन्मोत्सवातील विविध कार्यक्रमात सोमनाथ महाराज भालेकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा रुजू झाली. या वेळी पंचक्रोशीतील भाविक, नागरिक, श्रींचे भक्तांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती.
हनुमान जन्मोत्सव दिनी हजारो भक्तांनी ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात रांगा लावत मारुतीरायांचे दर्शन घेतले. या वेळी भाविकांनी श्रींना श्रीफळ अर्पण करीत पूजा केली.भाविकांना दूध प्रसादाचे वाटप झाले.जन्मोत्सवा निमित्त मंदिरात आकर्षक विविध रंगी फुलांची लक्षवेधी सजावट करण्यात आली होती. मंदिरावर व परिसरात विद्युत रोषणाईने मंदिर लक्षवेधी सजले होते. भक्तिमय वातावरणात आळंदीकर ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळाचे भजन सेवेने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची सांगता रात्री उशिरा झाली. श्री हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. पंचक्रोशीत धार्मिक वातावरण होते. या जन्मोत्सवात आळंदीकरांसह भाविक भक्तांनी नवशिवशक्ती तरुण मंडळाने भाविकांची सेवा सुविधा परिश्रम पूर्वक उपलब्ध करून देण्यास विशेष परिश्रम घेतले. माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचे विशेष नियंत्रणात जन्मोत्सव साजरा झाला.या वेळी कीर्तनकार सोमनाथ महाराज भालेकर यांचा मंडळाचे वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, शांतता कमेटी सदस्य डी.डी.भोसले पाटील, वारकरी साधक विध्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदीकर ग्रामस्थ वारकरी सांप्रदायिक गावकरी भजनी मंडळाचे मार्गदर्शक पंडितराव रानवडे, कांताराम घुंडरे पाटील, रामदास महाराज उभे, नागनाथ अण्णा कांबळे, गव्हाणे महाराज, सुरेश दळवी, शिवाजी कारेकर गुरुजी, विशाल रानवडे, शाळीग्राम घाटोळ, सुधाकर जंगले, माउली घुंडरे पाटील यांचेसह आळंदीकर गावकरी ग्रामस्थ यांनी भजन सेवा देत श्री हनुमान जन्मोत्सवाची गावकरी भजन सेवेने हरिनाम गजरात सांगता केली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?