पिंपरी चिंचवड प्रतिनिधी गुरुवार दिनांक (१९ फेब्रुवारी २०२६ ) रोजी श्री सदगुरू शिक्षण संस्था भेकराईनगर संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अनु जाती मुला मुलींची आश्रम शाळा गंगानगर फुरसुंगी पुणे येथे सरस्वती ग्रंथालय, व सर्व युनिट यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यावेळी अनेक मान्यवरांच्या यांच्या हस्ते सरस्वती ग्रंथालया चे श्री उत्तम साठे सर ग्रंथपाल,आश्रमशाळा पालक आशिष, गंगानगर ग्रामस्थ ओमकार, रुद्र,राहुल,श्रीम आढाव, सौ साळुंखे मॅडम लाईट बिल वाटप व्यवस्था महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ फुरसुंगी प्रतिनिधी, अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकण्यासाठी कशा पद्धतीने सामना करावा लागला महाराज कशा पद्धतीचे पराक्रमी होते अशा अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख करत जयंतीच्या निमित्ताने उजाळा देण्यात आला. प्रथमता संस्था अध्यक्ष महामुनी सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आपले काम पुढे नेण्यासाठी, आनखी मानसे जोडणे व ती आपल्या बरोबर राहतील याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. असे मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पोपहार चहापान व खाऊ वाटप करुन कार्यक्रम संपन्न झाला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींची आश्रम शाळा गंगानगर फुरसुंगी शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
19