| प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड, (दिनांक ८ फेब्रुवारी२०२६) महाराष्ट्राचे कणखर आणि धुरंदर नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. शोक व्यक्त करण्यासाठी आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकारांनी आज थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात शोकसभा घेतली. अजितदादा पवारांच्या कर्तृत्वाचे स्मरण राहावे म्हणून १४ रोपांचे वृक्षारोपण करून आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर नितांत प्रेम होते. त्यांनी शहराचा दैदिप्यमान विकास केला. त्याच्या जगण्याने शहरावर शोककळा पसरली. शहराच्या MH १४ प्रमाणे आणि जिल्ह्यातील १४ तालुके असे प्रतिकात्मक साम्य लक्षात घेता दादांचे स्मरण व्हावे म्हणून आज शोकसभा झाल्या नंतर १४ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उपस्थित पत्रकारांच्या वतीने शोकसभेला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यामध्ये गणेश मोकाशी (महाराष्ट्र उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद), चिराग फुलसुंदर (जिल्हा संघटक) अनिल वडघुले (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ) विनय सोनवणे (अध्यक्ष, डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड) सागर सूर्यवंशी (सचिव) संतोष गोतावळे (उपाध्यक्ष) सिद्धांत चौधरी (सदस्य), हनुमंत रामदासी (सदस्य) संजीव सूर्यवंशी (सदस्य) रमेश साठे (सदस्य) इत्यादी पत्रकार उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आपल्या मनोगतात दादांच्या कार्याची आठवण करून शोक व्यक्त केला. सार्वजनिक पसायदानाने पठण केले त्यांनंतर वृक्षारोपण करण्यात आले.