Home आरोग्य इंडियन डेंटल असोसिएशनच्या(पिंपरी-चिंचवड) अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी

इंडियन डेंटल असोसिएशनच्या(पिंपरी-चिंचवड) अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड येथील नामांकित अशा इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड पुणे ची वार्षिक सर्वसाधारण सभा, हॉटेल नियोवूड्स, वाल्हेकरवाडी दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली यामध्ये २०२६ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

डॉक्टर विनय कुमार शेट्टी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली

डॉक्टर गौरव विसपुते यांची सचिवपदी तर डॉक्टर दिपाली पाटेकर यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली.

डॉक्टर विनय कुमार शेट्टी मूळचे केंजूर, तालुका-उडपी,कर्नाटक येथील भूमिपुत्र सुशिक्षित परिवार श्री व सौ. केंजूर भास्कर शेट्टी आणि विनोदा शेट्टी यांचे सुपुत्र. डॉक्टर विनय कुमार शेट्टी यांनी आपले दंत वैद्यकीय शिक्षण हे मंगळूर येथील के.वी.जी. दंत वैद्यकीय महाविद्यालय येथून यशस्वीपणे पूर्ण केले.

banner

सण २००२ पासून पिंपरी-चिंचवड येथील नामांकित वाय.सी.एम सरकारी रुग्णालय येथून आपले दंत वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. डॉक्टर विनय कुमार शेट्टी गेले २३ वर्ष पिंपरी-चिंचवड दंत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत व सामाजिक कार्यात आपले योगदान देत असताना अनेक रुग्णांना त्यांनी सेवा देण्याचं काम या पिंपरी चिंचवड शहरांमध्ये करत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?