Home सामाजिक पिंपळे सौदागर येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

पिंपळे सौदागर येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड मनपाच्या सक्षमा व मैथिली सक्षमा प्रकल्पांतर्गत मार्गदर्शन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) च्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध उपाययोजना राबवल्या जातात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पिंपळे सौदागर येथे मनस्वी सक्षम महिला बचत गट व श्री संपदा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत दोन्ही महिला बचत गटांच्या एकूण 30 ते 35 सदस्यांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सक्षम प्रकल्प आणि सक्षमा प्रकल्प शहराच्या विविध भागांमध्ये महिला बचत गटांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक प्रगल्भता आणण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांचे मार्गदर्शनाखाली कार्यशाळेतील मान्यवरांनी महिला सदस्यांना योग्य मार्गदर्शन केले.

सक्षमा प्रकल्प मैथिली अस्मिता गडचे सक्षम प्रकल्प अधिकारी राजश्री खोत, समन्वयक दिपाली अंभोरे सी एफ ए आर च्या वर्कर नीलम ताई सरोदे, आरंभ फेडरेशन च्या खजिनदार मीनाक्षी शेट्टेवार, उपस्थित होत्या  महानगरपालिकेचे समूह संघटक अमोल कावळे यांनी मनपाच्या महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या उपक्रम व योजनां बद्दल सविस्तर माहिती दिली. महिला बचत गटांमार्फत समाजात या योजनांचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार कसा करता येईल यावर त्यांनी विशेष मार्गदर्शन देत असताना सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनस्वी सक्षम महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्राजक्ता जाधव यांनी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण केली.

banner

त्यावेळी त्या म्हणाल्या, “बहुजन समाजातील महिलांसाठी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्याचे व शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे महान कार्य ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी केले. फुले दाम्पत्यांचा हा वैचारिक वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये पारित केला आणि खऱ्या अर्थाने समाजातील महिलांना कायद्याने त्यांचे हक्क मिळवून दिले.

कार्यशाळेसाठी मनस्वी सक्षम महिला बचत गटाच्या उपाध्यक्ष राणीबाई वाघमारे, सचिव जयश्री शिंगोटे, व सदस्य सुनंदा लोहकरे, प्रज्ञा जगताप, नेहा जगताप, नंदा सोनटक्के, प्रियंका सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, कल्पना वाघमारे, प्रगती नांगरे, तसेच श्री संपदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा अस्मिता गडचे, सचिव रंगलता राऊत, सदस्य सुनिता गायकवाड, स्वाती जाधव, अक्षदा ओव्हाळ, पुष्पलता जेना, मीना धनवे उपस्थित होत्या.आझाद महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता दिवे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. प्रियंका ढगे यांनी केले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?