13
पिंपरी प्रतिनिधी दिनांक ७ डिसेंबर २०२५ छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक (पाटील) यांनी हजारो मित्र परिवारासह मातोश्री येथे हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत त्यांच्या आसनापुढे नतमस्तक होऊन मा. मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सदर प्रवेशावेळी पुणे शहर प्रमुख श्री.गजानन थरकुडे, मंगेश खेडेकर, आनंद खामकर,उमेश चांदणे, नागेश जाधव, काका चव्हाण, सागर इंगळे उपस्थित होते.