Home पिंपरी चिंचवड देहूच्या ‘अभंग गाथा वन’ मध्ये वृक्षारोपणाचा पवित्र संकल्प; पद्मश्री पोपटराव पवार आणि बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते १४० वृक्षांची लागवड

देहूच्या ‘अभंग गाथा वन’ मध्ये वृक्षारोपणाचा पवित्र संकल्प; पद्मश्री पोपटराव पवार आणि बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते १४० वृक्षांची लागवड

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड, २४ मे २०२५ –

संत तुकोबांच्या पावन देहू नगरीतील ‘अभंग गाथा वन’ येथे पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला. ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे (पंढरपूर देवस्थान विश्वस्त व देहू देवस्थान माजी अध्यक्ष) यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी वृक्षारोपणाचे भव्य आयोजन करण्यात आले.

या पवित्र उपक्रमाची सुरुवात आदर्श कीर्तनकार संतवीर गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांच्या शुभहस्ते झाली. त्यांनी ७५ वृक्षांची लागवड करून या हरित मोहिमेस प्रारंभ केला. यानंतर सामाजिक कार्याच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते ६५ वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाला देहू देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, माजी अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प. भानुदास हरिभाऊ वैरट (व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र), डॉ. प्रवीण निकम (मुख्य अधिकारी, देहू नगरपंचायत), तसेच सौ. पूजा ताई दिवटे (नगराध्यक्ष, देहू नगरपंचायत) यांची उपस्थिती लाभली.

banner

‘अभंग गाथा वन’ या स्थळावर संत अभंगांचा अनमोल वारसा जपणाऱ्या या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे देहू नगरीच्या आध्यात्मिक वातावरणात हरित चैतन्याची भर पडली आहे.

हा उपक्रम भावी पिढीला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आणि संत परंपरेशी एकरूप असलेला असा एक आदर्श ठरला आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?