Home सामाजिक मराठवाडा युवा मंच वतीने रुपीनगर मध्ये सप्ताह साजरा

मराठवाडा युवा मंच वतीने रुपीनगर मध्ये सप्ताह साजरा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी दिनांक (27 मार्च 2025) रोजी रुपीनगर मध्ये मराठवाडा युवा मंच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्यावेळी संगीत गाथा पारायण सोहळा पहाटे काकडा सकाळी पारायण सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन व हरीजागर अशा प्रकारे कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नामवंत प्रतिष्ठित महाराज प्रवचनकार भजनी मंडळ उपस्थित होते प्रथम कीर्तनकार डॉक्टर ह.भ.प. गजानन महाराज व्हावळ,ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे,ह.भ.प.विशाल महाराज खोले,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर,ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर, श्री शेत्र नारायण गडाचे उत्तराधिकारी प.पु. संभाजी महाराज यांच्या वतीने भक्तिमय वातावरणात काल्याचे किर्तन संपन्न झाले जय हनुमान भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ,पावन हनुमान भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, गुरुदत्त महिला भजनी मंडळ,मुक्ताई महिला भजनी मंडळ,रामदास सेवा भजनी मंडळ, अशा अनेक कीर्तनकार प्रवचनकार यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली होती

मराठवाडा युवा मंचाचे अध्यक्ष खंडु सगळे,उपाध्यक्ष सतीश कंठाळे, औदुंबर पाडुळे,सचिव सर्जेराव कचरे, महादेव तांबे,खजिनदार दीपक बोर्डे, उद्धव सरोदे,सहसचिव अजय आजबे,मच्छिंद्र येवले,उमेश डोके, महिला अध्यक्ष सुजाताई काटे, कार्याध्यक्ष सोमनाथ मंडलिक,पांडुरंग कदम,कोषाध्यक्ष अशोक मराडे, शंकर तांबे, सहजिंदार विठ्ठल शिंदे, त्रिंबक मुळीक, अश्या अनेक भाविक भक्तांनी कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते आमदार, खासदार,आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद होता मराठवाडा युवा मंचच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन केले होते

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?