Home पिंपरी चिंचवड जागतिक महिला दिनानिमित्त उक्तृष्ट कार्य केलेल्या महिलांचा सन्मान पत्रकारांनी केल्यामुळे कार्य करण्यास ऊर्जा मिळते ~ डॉ. आशाताई पाटील (शिक्षण तज्ञ)

जागतिक महिला दिनानिमित्त उक्तृष्ट कार्य केलेल्या महिलांचा सन्मान पत्रकारांनी केल्यामुळे कार्य करण्यास ऊर्जा मिळते ~ डॉ. आशाताई पाटील (शिक्षण तज्ञ)

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

युवक युवतींची आयकॉन सिने अभिनेत्री श्रुती उबाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून केला सन्मान

| प्रतिनिधी | दिनांक १० : पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त केला जातो. पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने यंदा २०२५ साली जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात युवती युवकांचे आयकॉन सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रुती उबाळे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून सन्मानित केले. तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आशा ताई पाचपांडे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देवून सन्मानित केले. यांच्या सह सिने अभिनेत्री पूजा पवार साळुंखे, कायनेटिक ग्रीन च्या संचालिका सुलज्जा फिरोदिया, मोटवानी यांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव केला. यावेळी सरिताताई साने ( सामाजिक व राजकीय ) , रुपलिताई अल्हाट ( सामाजिक व राजकीय ) , प्राजक्ता गोरडे टाकळकर ( प्रशासकीय ), निकिता कांबळे ( शैक्षणिक ), सुप्रिया साठे ( लोक प्रबोधन ) अनिताताई काटे ( शैक्षणिक व सामजिक ) या आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला. तसेच दहा बचत गटांचा सन्मान केला. मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास , पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मिडिया परिषद अध्यक्ष विनय सोनवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर मंचावर उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर व सर्व राज्य कार्यकारणी पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास उपस्थितांना सांगण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिणींचा करण्यात आलेल्या सन्मानामुळे  उपस्थित महिला भगिनींना प्रेरणा मिळाली . उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या देवून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अपर्णा शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदच्या सर्व आयोजक पत्रकार पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून आभार प्रदर्शन विनय सोनवणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेचे सागर सूर्यवंशी, राम शेडगे, अशोक कोकणे, किशोरअण्णा लष्करे, संभाजी बरबोले, मारुती बानेवार, योगेश वडमारे, भाऊसाहेब निकम, देविदास लिमजे, माऊली भोसले, राहुल जाधव, नरेशजी, प्रसाद वडघुले, सिद्धांत चौधरी, रमेश साठे, चिराग फुलसुंदर, प्रकाश जमाले, श्रद्धा प्रभुणे, संतोष गोतावळे, महावीर जाधव, पराग डिंगणकर, सचिन पाटील आदी. पत्रकार उपस्थित होते. जय माता दि ग्रुप च्या एमडी स्वाती मोहिते व मनीष मोहिते, नढे अण्णा, हायकोर्स वकील ऍडव्होकेट सुप्रिया गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून दिलीप सोनिगरा तर सह प्रायोजक कायनेटिक ग्रीन, जय माता दि. ग्रुप यांनी सहकार्य केले. पिंपरी येथील ASM कॉलेज च्या सभगृहात व महिला भगिनिंच्या प्रचंड प्रतिसादात कार्यक्रम यशस्वी झाला.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?