देशाचे भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग फार महत्त्वाचा – पराग काळकर
पिंपरी चिंचवड
जय व्हिजन मास्टरमाईंड ॲकॅडमी यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाचे प्रकूलगुरु पराग काळकर, माजी सहसचिव, रयत शिक्षण संस्था, साताराचे प्रा.डी.डी पाटील, साहित्यिक आणि विचारवंत ज्ञानेश्वर जाधवर, जय व्हिजन मास्टरमाईंड ॲकॅडमी संचालक पद्माकर मोरे, अभिनेते संदीप साकोरे, समाजसेविका संगिता कोकणे, मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभवन, विजया सुतार,सामाजिक कार्यकर्ते नरेश आप्पा खुळे, प्रा. बाबासाहेब दूधभाते, आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी करिअर मार्गदर्शन, गुणवंत विद्याथी सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

डॉ. पराग काळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना समर्पण, शिस्त आणि ध्येय निश्चितीच्या महत्त्वावर प्रभावी भाषणातून प्रेरणा दिली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, उत्कृष्ट पत्रकार सत्कार समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर जाधवर म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या आयुष्यामुळे आज हजारो लोक म्हणजे अख्या पिढ्याच्यापिढ्या शिकू शकलेल्या आहेत. करिअरची विषयी दूरदृष्टी त्या काळामध्ये त्यांनी ठेवली होती म्हणून आज हे आपण हे सगळं अनुभवतो आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी सांगितलं होतं की महाराष्ट्राला जर पुढे दिशा द्यायची असेल तर आपल्याकडे असंख्य माहिती आहे. त्या माहिती मधून योग्य माहिती निवडणारा नेता असणं गरजेचं आहे. ती दूरदृष्टी असेल तर आपल्या पाल्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पाऊल आहे.
आभार व्यक्त करताना मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभवन म्हणाले की भविष्यकाळात कोणी नगरसेवक होईल, काही सामाजिक कार्यकर्ते होतील. तर राजकारणात पण येतील विद्यार्थी येतील हे सर्व विद्यार्थ्यांनी ठरवले तर शक्य होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी केले.
