Home शिरूरमहाराष्ट्र तळवडे ज्योतिबा मंदिरात चातुर्मास निमित्त भाविक साधकांना धार्मिक पर्वणी

तळवडे ज्योतिबा मंदिरात चातुर्मास निमित्त भाविक साधकांना धार्मिक पर्वणी

ज्योतिबा मंदिरात चातुर्मास विविध उपक्रमांचे आयोजन 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी दिनांक ४ आगष्ट २०२६) तळवडे येथील ज्योतिबा नगर मधील ज्योतिबा मंदिरात चातुर्मास निमित्त भाविक साधकांना धार्मिक पर्वणी कार्तिकी एकादशी पर्यंत लाभणार असल्याची माहिती श्रींचे पुजारी नवनाथ महाराज भालेकर यांनी दिली.

ज्योतिबा नगर तळवडे ज्योतिबा मंदिरात दर महिन्याला गुरूचरीत्र नवनाथ भक्ती, सार

केदारविजय पारायण होते. दर रविवारी अन्नदान, आरती, शिवलीला साखळी पारायण कायम सुरु असते. गेल्या ४२ वर्षाहून अधिक काळ श्रींचे मुख्य पुजारी म्हणून नवनाथ महाराज भालेकर आपली सेवा अखंड रुजू करत आहेत.

चातुर्मास पर्वणीत देव घरा समोर ३३ गोपद्म रांगोळीने काढणे, यास गोपद्म व्रत असे म्हणतात. भगवान श्री स्वामी समर्थ व ज्योतिबा महाराज, श्रीमहाविष्णुंची सेवा अधिकाधिक स्वरुपात सर्व ज्योतिबा स्वामी सेवेकऱ्यानी संपुर्ण चातुर्मासात करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गुरू मंत्र पठण, श्री स्वामी माळ, श्री ज्योतिबा महाराज माळ नामस्मरण करण्यास आवाहन करण्यात आले आहे. श्रीविष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण, श्रीपुरुष सुक्त व श्रीसूक्त पठण, ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप चातुर्मास काळात करावा असे नवनाथ महाराज यांनी या वेळी सांगितले.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles