Home शिरूरमहाराष्ट्र मोशी कचरा डेपो कचऱ्याचा ढीग तीन मजली इमारतीवर कोसळला 

मोशी कचरा डेपो कचऱ्याचा ढीग तीन मजली इमारतीवर कोसळला 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

 

पिंपरी चिंचवड (दिनांक ८ जुलै २०२६)कचरा डेपो येथे दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग तीन मजली इमारतीवर कोसळला या इमारतीखाली अंदाजे १९ व्यक्ती अडकल्या चा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यातील ४ व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात आले असुन बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफ घटनास्थळी दाखल आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दल, पोलीस या बचाव कार्यात सहभागी आहे. महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्याच्या मदतीसाठी लष्कराला देखील पाचारण करण्यात आले आहे. भारतीय सेनेचे देहूरोड येथील दल दाखल झाले असून यामध्ये ४ अधिकारी आणि २५ जवानांचा समावेश आहे. तथापि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles