Home शिरूरमहाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर चंद्रकांत लोंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर चंद्रकांत लोंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दिनांक १ जुलै २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर पिंपरी चिंचवड शहरातील चंद्रकांत लोंढे (पिंपरी, पुणे) यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र दि. २९ जून २०२६ रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांनी प्रदान केले.

नियुक्तीनंतर चंद्रकांत लोंढे यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, सामाजिक न्याय विभागाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चंद्रकांत लोंढे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles