Home शिरूरमहाराष्ट्र पांडुरंग कदम यांची माथाडी कामगार संघाच्या ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुखपदी नियुक्ती; आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

पांडुरंग कदम यांची माथाडी कामगार संघाच्या ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुखपदी नियुक्ती; आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

भाजपला माथाडी कामगार क्षेत्रात बळ; पांडुरंग कदम यांचा प्रवेश

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

निगडी,( दिनांक १८ जून २०२६) महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्या वतीने ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पांडुरंग बाबुराव कदम यांची संघटनेच्या ‘ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पांडुरंग कदम हे यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रुपीनगर-तळवडे विभागातील उपविभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

कदम हे सध्या मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, निगडीचे चेअरमन असून कामगार, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तसेच माथाडी संघटनेतील नव्या जबाबदारीमुळे परिसरातील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पांडुरंग कदम यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेची भूमिका अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

banner

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे अध्यक्ष संजय बापू निकम, पुणे जिल्हाध्यक्ष आझम खान, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, माजी नगरसेवक एस. के. बापू भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, शिवानीताई नारळे, शीतलताई वरणेकर, सुदेव अप्पा नारळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय अशोक काळे, इनदास पाटील, अमोल मदने, श्रीकांत मोरे, बाबासाहेब पोते, माऊली पाचपुते, दादा कदम, गोरक्षनाथ दुबाले, नितीन कदम, कैलास तोडकर, सचिन नरवडे तसेच मोठ्या संख्येने मुकादम, माथाडी कामगार व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पांडुरंग कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त घोषणाबाजी आणि मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?