पिंपरी प्रतिनिधी| (दिनांक २९ मे २०२६)
पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी, दापोडी, काळेवाडी आणि परिसरात विषारी दारू सेवनामुळे १३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना केवळ अपघात नसून शहरात सुरू असलेल्या अवैध दारू रॅकेटचा थेट परिणाम असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
मनसेच्या प्रमुख मागण्या
उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा
सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी
कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी
मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन द्यावे
शहरातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर संयुक्त धाडसत्र राबवावे
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा विविध प्रकारच्या मागण्या मनसे कार्यकर्त्यांनी मांडल्या
निवेदनावेळी उपस्थित पदाधिकारी
राजू सावळे – उपशहर अध्यक्ष रुपेश पटेकर – शहर सचिव
विनोद भंडारी – शहर संघटक
चंद्रकांत दावलें – शहर सचिव
अलेक्सझांडर अप्पा मोझेस – उप विभाग अध्यक्ष सागर भोकेरे,मनोज महाजन,पंढरी शेवळे, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.