Home गुन्हेगारी आळंदी देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही – ॲड राजेंद्र उमाप

आळंदी देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही – ॲड राजेंद्र उमाप

माऊली मंदिरातील दानपेटी रक्कम अपहार प्रकरण चार जणांना चौकशी नोटीसा जारी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी आळंदी (दिनांक २६ मे२०२६) माऊली मंदिरातील देणगी पेटीतील रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर आळंदी संस्थाननी तात्काळ संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे आळंदी संस्थान या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माऊली मंदिरातील भक्त निवासात आयोजित पत्रकार परिषदेत मंदिरातील वारुळे घटने बाबत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेस प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी ग्रामस्थ पदाधिकारी नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, डी. डी. भोसले पाटील, विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.
ॲड उमाप म्हणाले, आळंदी संस्थान कोणालाही याप्रकरणी पाठीशी घालणार नाही इतर चार जणांवर खुलासा करण्यासाठी नोटिसा देण्यात आले आहेत

यामध्ये व्यवस्थापक व्यवस्थापक उपव्यवस्थापक लेखापाल आणि अन्नदान विभाग प्रमुख यांचा समावेश आहे त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे माऊली मंदिरातील कर्मचारी सेवक यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार असून सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी सेवा या बाबत कडक नियमावली संस्थानने जाहीर केली असून प्रभावी उपाय योजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अपहार प्रकरणी विशाल वारुळे यांने विविध विभागात काम करीत असताना संबंधित विभागातील कर्मचारी, सेवक यांचा विश्वास संपादन करून काम केले. त्याची नेमणूक या साठी विश्वस्तांनी शिफारस केली नसल्याचे विश्वस्तांनी सांगितले. वारुळे याने केलेल्या कामामुळे त्याला मदतीस घेण्यात आले होते. तो देवस्थानचा कर्मचारी नव्हता. त्याने अन्नदान विभाग, पालखी सोहळा काळात आचारी म्हणून काम केले होते. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासात त्याचेवर संशय आल्याने तक्रार देऊन त्याचेवर देणगी पेटी तील रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा देवस्थानने केलेल्या तक्रारी वरूनच दाखल झाल्याचे ॲड उमाप यांनी सांगितले.
संशयास्पद हालचाल निदर्शनात असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही. अजून कोणी या प्रकरणात आढळून आल्यास त्यांचेवर देखील कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही ॲड उमाप यांनी पत्रकार परिषदेतून भाविक, नागरिक भक्तांना दिली. तो पगारा शिवाय कामकाज करीत होता.या प्रकरणी देवस्थानने आता कडक भूमिका घेतली असून सेवक, कर्मचारी यांच्यासाठी नियमावली तयार केली असून सर्वांवर कडक नजर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशयास्पद हालचाल निदर्शनात असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही. अजून कोणी या प्रकरणात आढळून आल्यास त्यांचेवर देखील कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही ॲड उमाप यांनी पत्रकार परिषदेतून भाविक, नागरिक भक्तांना दिली. तो पगारा शिवाय कामकाज करीत होता. या प्रकरणी देवस्थानने आता कडक भूमिका घेतली असून सेवक, कर्मचारी यांच्यासाठी नियमावली तयार केली असून सर्वांवर कडक नजर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवक विशाल वारुळे यांच्या विरोधात संशय व्यक्त झाल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या मुळे अधिक संशय वाढल्याने पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ॲड उमाप यांनी सांगितले.या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय दक्षता म्हणून घेण्यात आला आहे. मंदिरात कर्मचारी,सेवेकरी व सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. मंदिरात येण्या-जाण्यास प्रवेशद्वाराचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. येजा करताना सर्वांची तपासणी सुरक्षा रक्षकां कडून केली जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात सर्व प्रकारच्या पिशव्या किंवा संशयास्पद वस्तू आणण्यास निर्बंध जारी केले आहेत.दानपेटी देणगी रक्कम मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली, अत्याधुनिक सीसीटीव्ही व्यवस्था, एआय तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कर्मचारी, सेवेकऱ्यांची हजेरी डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीने घेण्यात येईल. यासाठी नियोजन होत असल्याचे ॲड उमाप यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?