Home शिरूरमहाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका देणार अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका देणार अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक ४ एप्रिल २०२६ ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी आर्थिक स्वरुपात आगाऊ रक्कम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी १५ हजार रुपये सण अग्रिम दिला जाणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात आगाऊ रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समिती आणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये अग्रिम अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटप केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा सणासाठी महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा हा निर्णय महत्त्वाचा समजला जातो.

सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी किंवा सातव्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल एस-१७ (वेतन संरचना ४७,६०० – १,५१,१००) पेक्षा कमी असणाऱ्या पात्र सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वरुपात या सण अग्रिमचा लाभ मिळणार आहे. सण अग्रिम म्हणून दिली जाणारी १५ हजार रुपयांची रक्कम सदर लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मे २०२६ पासून दरमहा १५०० रुपयांप्रमाणे १० हप्त्यांमध्ये परतफेड केली जाणार आहे. ही सण अग्रिमाची रक्कम १४ एप्रिल २०२६ पूर्वी अदा करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिका उत्साहात साजरी करीत असते. शिवाय जयंतीचे औचित्य साधून भव्य स्वरुपात पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे देखील आयोजन महापालिका दरवर्षी करीत असते. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता या जयंती सणासाठी एकरक्कमी सण अग्रिम देऊन या जयंती उत्सव सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
• रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

banner

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि प्रगतीचा दिलेला संदेश आजही आपल्या कामकाजाला दिशा देणारा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सण अग्रिम देण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचाही एक प्रयत्न आहे.
• डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?