Home शिरूरमहाराष्ट्र आळंदी परिसरात अवकाळी पावसाने झुडपलं नागरिकांची निवाऱ्यास धावपळ

आळंदी परिसरात अवकाळी पावसाने झुडपलं नागरिकांची निवाऱ्यास धावपळ

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी दिनांक (३० मार्च २०२६) आळंदी पंचक्रोशीत हलका ते माध्यम स्वरूपाचा अचानक अवकाळी पाऊस झाला. या वेळी झालेल्या पावसांत भाविक, नागरिकांची तारांबळ झाली. माउली मंद्र परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून आले. यात परिसरातील धुळीचे साम्राज्य झालेल्या पावसाने पावसाच्या पाण्याने पुढे वाहून पायऱ्यावरून गाळ युक्त पावसाचे पाणी वाहून गेले.
या वेळी परिसरातील वेळचणीला भाविक, नागरिकांनी आसरा शोधला. सुमारे अर्धातास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. प्रदक्षिणा मार्गावरील खड्यांचे ठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहन चालकांना मोठा सामना करावा लागत होता खड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात गाडी आदळत पुढे काढावी लागली. येथील श्री विठ्ठल रुख्मिणी चौकातील पेव्हर ब्लॉक खचल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्याना देखील रस्त्याचे खदत्यातील अंदाज न आल्याने गैरसोयीस सामोरे जावे लागले.

आळंदी परिसरात आल्हाददायक वातावरणात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पाऊस येत असल्याचा अंदाज येताच शेतक-यांनी आपापल्या शेतात कामे उरकण्याची लगबग केली. आळंदी वडगाव रस्त्यावरील ज्ञानसागर मंगल कार्यालया जवळील विद्युत डी.पी. जळाल्याने काही वेळ आळंदीतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वाढत्या संकटांनी बळीराजा खचला असून ख-या अर्थाने उभारी देण्यासाठी
शेतक-यांचा सात बारा कोरा करण्यासाठी शेतकरी बांधवाना राजाश्रयाची गरज असल्याचे शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी सांगितले. जो पर्यंत शेतकरी कर्ज मुक्त होत नाही तो पर्यंत बळीराजा सुखी होणार नाही. तात्काळ राज्य व केंद्र सरकार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज मुक्त करून शेतमाल उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्य शासनाकडून बळीराजाला न्याय मिळेल अशी आशा धरून शेतकरी टक लावून मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करून नदी बार माही वाहती ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. आळंदी शिव रस्त्या वर विकास कामे सुरु आहेत. मात्र पावसाचे पाण्याने रहदारीला गैरसोयीचे झाले. परिसरातील पाण्याचा निचरा,सांडपाणी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास प्राधान्य देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?