Home शिरूरमहाराष्ट्र क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत महापौरांच्या हस्ते कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर.

क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत महापौरांच्या हस्ते कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा प्रस्ताव; सर्व सदस्यांची एकमताने मंजुरी.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक २७ मार्च २०२६)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कला, क्रीडा व साहित्य समितीची आढावा बैठक कला, क्रीडा व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील धोरणांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत शहरातील कलाकार, खेळाडू व साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, त्यांना योग्य सन्मान देणे तसेच त्यांच्या कर्तृत्वाची दखल शहर, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कशी घेतली जाईल याबाबत विस्तृत विचारमंथन करण्यात आले.

या बैठकीस कला, क्रीडा व साहित्य समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर ,शाम जगताप, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे तसेच उप आयुक्त पंकज पाटील,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर पिंपरी चिंचवडचे नाव उंचावणाऱ्या कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षनेते तथा कला क्रीडा व साहित्य समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी हा ठराव मांडला असून सर्व सदस्यांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.

banner

यावेळी पुणे महापौर चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या संघाचा कला, क्रीडा व साहित्य समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. सभापती कैलास कुटे यांच्या हस्ते संघाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले . या संघात मनीषा राठोड, रेखा राठोड, कोमल राठोड, शिफा वस्ताद, सविता गवई, भूमिका गोरे, विधा गायकवाड, निकिता माळी, पूजा तेलंग, श्रावणी सावंत, रूपाली डोंगरे, कीर्ती कडगंची, प्रीती केरळकर आणि नंदिनी साधू यांचा समावेश आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?