Home शिरूरमहाराष्ट्र खानदेश मराठा समाजाचा गणेश कस्पटे यांना भाजप उमेदवारी साठी जाहीर पाठिंबा.

खानदेश मराठा समाजाचा गणेश कस्पटे यांना भाजप उमेदवारी साठी जाहीर पाठिंबा.

स्नेह मेळाव्यातून व्यक्त झाल्या नागरिकांच्या भावना उमेदवारीला आलं बळ

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी वाकड दिनांक (२६ डिसेंबर २०२५) प्रभाग क्रमांक २६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार गणेश कस्पटे यांना नागरिकांचा वाढता विश्वास अधिक दृढ होत असतानाच, आता संपूर्ण खानदेश समाजही कस्पटे यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याची अनेक मतदारसंघातील नागरिकांनी उघडपणे व्यक्त केले आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खानदेश समाज बांधवांच्या भव्य स्नेहमेळाव्यातून हा विश्वास परखडपणे आपली भूमिका मांडताना दिसून आला.

या स्नेहमेळाव्यास प्रभागातील विविध भागांतून मोठ्या संख्येने खानदेशी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी अनेक ज्येष्ठ, युवक व महिला बांधवांनी आपापल्या भावना व्यक्त करताना, “गणेश कस्पटे आणि त्यांच्या पत्नी सारिका कस्पटे हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते अनेकांच्या सुखदुःखामध्ये समाजासाठी अनेक वेळा धावून येणारे कुटुंब आहे. अनेक वेळा नागरिकांच्या अडचणीच्या वेळी ते आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात असे मत व्यक्त केले.

समाज बांधवांनी पुढे सांगितले की, सामाजिक उपक्रम, मदतकार्य, सण-उत्सव, आरोग्य शिबिरे, अडचणीतील कुटुंबांना आधार अशा अनेक प्रसंगी कस्पटे दाम्पत्याने कोणताही भेदभाव न करता मदतीचा आम्हाला हात दिला.

“त्यामुळे खानदेश समाज कायम त्यांचा ऋणी आहे आणि येणाऱ्या काळात प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण गणेश कस्पटे यांच्या पाठीशी ठाम उभे राहू,” अशी ठाम भूमिका अनेकांनी मांडली.

banner

या वेळी उपस्थितांना संबोधित करताना गणेश कस्पटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी आजपर्यंत जे काही कार्य केले आहे, ते केवळ माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून केले आहे. आपण सर्व बांधवांनी मला आपलंसं मानून स्वीकारलं, प्रेम दिलं, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आणि आनंद आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

प्रभाग क्रमांक २६ मध्ये आधीच नागरिकांचा विश्वास, सामाजिक कार्यातून उभे राहिलेले नेतृत्व आणि आता खानदेश समाजाचा जाहीर पाठिंबा यामुळे गणेश कस्पटे यांचे राजकीय वजन अधिक वाढताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आणखी बळकट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पद नसतानाही सातत्याने काम करणारा नेता, पद मिळाल्यावर किती मोठा बदल घडवू शकतो, याचा विश्वास आता प्रभाग २६ मधील विविध समाजघटकांमध्ये अधिक ठामपणे निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?