Home पिंपरी चिंचवड विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी — दहावी परीक्षेत १००% निकाल; पूर्वा पगारे शाळेत पहिल्या क्रमांकावर

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी — दहावी परीक्षेत १००% निकाल; पूर्वा पगारे शाळेत पहिल्या क्रमांकावर

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड (१३ मे २०२५): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूल ने यंदाही आपली यशाची परंपरा कायम ठेवत १००% निकालाची उजळणी केली आहे.

पूर्वा राकेश पगारे – ९७.६०% (शाळेत प्रथम)

या वर्षी एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी

८४ विद्यार्थ्यांना ‘विशिष्ट गुण’,

५० विद्यार्थ्यांना ‘प्रथम श्रेणी’,

banner

आणि ७ विद्यार्थ्यांना ‘द्वितीय श्रेणी’ प्राप्त झाली आहे.


रुही फडणीस – ९६.६०% (शाळेत द्वितीय)

शाळेतील टॉपर ठरली पूर्वा राकेश पगारे, जिने ९७.६०% गुण मिळवले. विशेष म्हणजे, पूर्वाने कोणत्याही खाजगी क्लासेसचा आधार न घेता फक्त शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आणि स्वतःच्या मेहनतीवर हे यश संपादन केले. तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला आहे.

द्वितीय क्रमांक पटकावला रुही फडणीस हिने ९६.६०% गुणांसह, तर तिसरे स्थान मिळवले चेतना चंदन हिने ९६% गुणांसह.


चेतना चंदन – ९६% (शाळेत तृतीय)

शाळेचे अध्यक्ष डॉ. भरत चव्हाण पाटील,
संचालक डॉ. श्वेता भरत चव्हाण पाटील,
सचिव प्रा. डी. आर. करनुरे,
आणि प्राचार्य श्री. सिरिल अँथनी जगन यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यानंद भवन हायस्कूलच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शाळेने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची पावती दिली आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?