Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. १ एप्रिल २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्र. २१ पिंपरी मधील गावठाण व कॅम्प परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच समाजविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यास संमती देण्यात आली.

महापालिका हद्दीतील मौजे पिंपळे गुरव, रहाटणी, ताथवडे येथील रस्त्याने किंवा आरक्षणाने बाधित जागा ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला. याशिवाय, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वापरात नसलेली अथवा मोडकळीस आलेली सार्वजनिक व सामुदायिक शौचालये यांचा सर्वे करून ती निष्कासित करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.

banner

या निर्णयांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील आणि नागरी सुविधांचा विकास वेगाने होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?