Home पिंपरी चिंचवड “पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई – १०,५०५ चौ. फु. क्षेत्र निष्कासित”

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई – १०,५०५ चौ. फु. क्षेत्र निष्कासित”

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. २६ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २३ आणि प्रभाग क्र. २४ येथील तुळजाई कॉलनी व बापुजी बुवा नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १०,५०५ चौ. फु. क्षेत्रफळ असलेली ३ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तसेच शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत उपअभियंता सुनिल अहिरे, कनिष्ठ अभियंता मोरे, अतिक्रमण निरीक्षक जगताप, बीट निरीक्षक सौरभ शिरसाठ, विनोद बजबळकर, पवार आणि मितुष सावंत यांचा सक्रिय सहभाग होता.

ही कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेच्या धडक पथकासह २० एमएसएफ जवान, १५ मजूर, १ जेसीबी ब्रेकर, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि ५ हातोड्यांचा वापर करण्यात आला.

महापालिकेने पुन्हा एकदा शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे टाळून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?