Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारकांना अभिवादन

महापालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारकांना अभिवादन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी दि.२३ मार्च २०२५ :- शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव हे प्रखर देशभक्त,थोर क्रांतिकारक तर होतेच शिवाय ते स्वातंत्र्यपूर्व काळातील देशप्रेमींचे एक प्रेरणास्रोत देखील होते,त्यांच्या बलिदानाचा आणि व्यापक विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले.पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी या थोर क्रांतिकारकांच्या प्रतिमेस तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?