Home पिंपरी चिंचवड महाशिवरात्र महोत्सवानिमित्त रुपीनगरमध्ये नागनाथ महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

महाशिवरात्र महोत्सवानिमित्त रुपीनगरमध्ये नागनाथ महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

रुपीनगर, 28 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्र महोत्सवानिमित्त नागनाथ महादेव मंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. नागेश्वर प्रतिष्ठान व मृत्युंजय मित्र मंडळाच्या वतीने सरस्वती हाऊसिंग सोसायटी, पूर्व रुपीनगर परिसरात हा भव्य सोहळा संपन्न झाला.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी, ह. भ. प. महेंद्र शास्त्री महाराज मळेकर (श्री क्षेत्र भगवानगड) यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. रात्री 8 ते 10 या वेळेत पार पडलेल्या या कीर्तनाला भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला.

दुसऱ्या दिवशी, गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी, ह. भ. प. सदाशिव महाराज ढवळे (सरस्वती वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र देहू) यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिरसाची अनुभूती दिली. या वेळी रामदास सेवा भजनी मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ, आणि ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी कीर्तनात सहभागी होऊन वातावरण भक्तिमय केले.

banner

यंदाही सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नागेश्वर प्रतिष्ठान व मृत्युंजय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी तसेच सोसायटीतील सर्व सभासद व वर्गणीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?