(प्रतिनिधी) : निघोजे येथील पवनराज गणेश मंदिराचा अकरा वा वर्धापन दिनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत मंगलमय वातावरणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिना निमित्त बालिंग वस्ती येथे विविध कार्यक्रम झाले. यामध्ये पहाटे ५ ते ७ अभिषेक व काकड आरती झाली.
भैरवनाथ भजनी मंडळ सकाळी ८ ते १ होमहवन, श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १ ते ४ या वेळात भैरवनाथ महिला भजनी मंडळ निघोजे, ४ ते ६ हरिपाठ मुकूंद महाराज चौधरी, रात्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा तसेच प्रमुख पाहुणे यांच्या सत्कार करण्यात आला, रात्री हरिजागर भैरवनाथ महाराज भजनी मंडळ निघोजे यांचे वतीने झाला. ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी कीर्तन श्रवण, महाप्रसादास मोठी गर्दी केली. गावातील सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक आदी मान्यवर तसेच नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.