Home पिंपरी चिंचवड उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर तालुक्यात 11 शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी प्रचार आणि प्रसार उत्साहात घराघरात हरिपाठ संत साहित्य

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर तालुक्यात 11 शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी प्रचार आणि प्रसार उत्साहात घराघरात हरिपाठ संत साहित्य

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी / प्रतिनिधी : श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेतटी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर, सर्व घटक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील 5 वी ते 8 वी पर्यंतच्या 11 शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रम अंतर्गत हरिपाठ,पसायदान, श्री ज्ञानेश्वरी तील संत साहित्य यावर प्रचार आणि प्रसार करण्यात आला. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे माजी व्यवस्थापक, चरित्र समितीचे उपाध्यक्ष श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, इंद्रायणी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम गवारी, विकास शिवले, अर्जुन मैदनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी उपक्रमाचे मुख्य प्रचारक श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना ओळख श्री ज्ञानेश्वरी याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्य रुजावेत त्यांच्या तील नैराश्य नाहीसे व्हावे यासाठी हा उपक्रम असल्याचे श्री काळे म्हणाले. तसेच ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ नसून जीवन ग्रंथ असल्याचे व आपल्या जीवनामध्ये संस्कार निर्माण करण्याचा हा महान ग्रंथ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी प्रकाश काळे यांनी सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक बंधूं भगिनींना उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. आठवड्यातून एक दिवस पसायदान आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ या विषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन कले. मोबाइल व संगणकाच्या युगात दक्षता घेत वापर व्हावा. ही काळाची गरज आहे. या प्रसंगी डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची गरज काय या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय उपक्रमामध्ये नवीन माध्यमिक विद्यालय, सुकळी या शाळेमधून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शिवाजी हायस्कूल कु-हा काकोडा स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालय कु-हा काकोडा, नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी श्री शिवाजी हायस्कूल, वडोदा तसेच जे. ई. स्कूल मुक्ताईनगर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर श्री एस. बी. चौधरी विद्यालय, चांगदेव डॉ. जगदीश दादा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ,मुक्ताईनगर, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, मुक्ताईनगर आदी विद्यालयांमध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला.

मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मोठा प्रतिसाद मिळेल. आदिशक्ती संत मुक्ताई जुने मंदिर व नवे मंदिर येथे मान्यवरांनी दर्शन घेऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. योगी चांगदेव महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम मुक्ताईनगर तालुक्यात सर्वप्रथम शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केल्याबद्दल आदिशक्ती संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, मुक्ताई संस्थानचे ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज, ह. भ. प. उद्धव जुनारे महाराज, माजी सभापती निवृत्तीभाऊ पाटील, डॉ. जगदीश दादा पाटील आदी मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करून डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे मनापासून अभिनंदन केले. फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य प्रा. विनायक वाडेकर फाउंडेशन उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी उपस्थित होते. डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या निवास स्थानी सर्व मान्यवरांचा आदिशक्ती संत मुक्ताईची प्रतिमा भेट देऊन य निम्मित शाल, टोपी घालून सत्कार करण्यात आला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?