Home पिंपरी चिंचवड श्री ज्ञानेश्वर विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्काराने सन्मानित

श्री ज्ञानेश्वर विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्काराने सन्मानित

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासन वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पर्यावरण विषयक जनजागृती, वृक्ष लागवड व संवर्धन, पाणी साठवण, परिसर स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट आणि पर्यावरण विषयक प्रकल्प इ. कार्यक्रम राबविण्यात आले.

सदर उपक्रम व कार्यक्रमाची कार्य पूर्ती करून जिल्ह्यातून जवळपास २५० शाळापैकी खेड तालुक्यात सर्वात जास्त गुण प्राप्त केल्यामुळे श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी प्रशालेस उत्तेजनार्थ क्रमांकाचा ‘पंचतारांकित हरित शाळा’ पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, साळुंखे विहार, वानवडी, पुणे येथे प्रशालेच्या वतीने विद्यालयाचे उपप्राचार्य किसन राठोड व विज्ञान विभाग प्रमुख संजय उदमले यांनी स्विकारला.
यावेळी विभागीय वन अधिकारी प्र. मु. वन संरक्षक कार्यालय, सामाजिक वनीकरण म. रा. पुणेचे सुरेंद्र काळे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग पुणे च्या आशा भोंग, विभागीय वन अधिकारी जयश्री जगताप – जाधव, प्रज्योत पालवे, सहा. वनसंरक्षक जैव विविधता कार्यालय पुणेच्या तनुजा थोरात आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

विद्यालयास ‘पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल वृक्षारोपण समितीचे प्रमुख सूर्यकांत खुडे, उपप्रमुख रवींद्र शेखरे तसेच सुदाम मोहरे, गणेश लिखे, प्रकाश भागवत, शाम टेकाळे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे यांचेसह सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?