रूपी हौसिंग सोसायटी रुपीनगर, दत्त मंदिर येथे सायंकाळच्या महाआरतीला अनेक भक्तांची उपस्थिती
पिंपरी चिंचवड – प्रतिनिधी
ह.भ.प संजय (आप्पा) भालेकर
आणि ह.भ.प श्री बाजीराव (मामा) बेलदरे यांनी संत वाचनाला अनुसरून “नर्मदा परिक्रमा” केली पूर्ण केली. त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.

श्री दत्त सेवा प्रतिष्ठानचे कमिटी मेंबर , सामाजिक कार्यकर्ते दादा समगीर, विशाल भाऊ खानेकर, रवी सरोदे, गणेश पठारे नाना कोळेकर, शिवसेना वैद्यकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री मनेश भालेकर, आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार त्यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ह.भ.प संजय (आप्पा) भालेकर आणि ह.भ.प श्री बाजीराव (मामा) बेलदरे यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, ही तीर्थयात्रा का? कशासाठी? कुणी? व कधी करावी? नर्मदा परिक्रमा ही एक तीर्थयात्रा आहे ज्यामध्ये भारतातील नर्मदा नदीभोवती फिरणे समाविष्ट आहे. ही तीर्थयात्रा केल्याने धार्मिक, मन शांती , आध्यात्मिक वाढ होते.तसेच पृथ्वीवरील वैशिष्ट्ये, घडामोडी, वनस्पती, भूगर्भ, पुरातत्व, प्राणी, पक्षी, शास्त्र, इतिहास, भूगोल,योग, आयुर्वेद, शिल्पकला, संगीत, देवस्थाने आणि आश्रम भेट यांची प्रचिती होती. या यात्रेत एक रोमांचरहस्य आणि अनेक अनुभवचे भंडार आहे.
दुसऱ्यांचे अनुभव वाचून, ऐकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वतः घेणं केव्हाही श्रेयस्कर! जर तुमची इच्छाशक्ती असेल तर परमेश्वर ही परिक्रमा, तीर्थयात्रा भक्ताकडून करून घेतो. नर्मदे हर.. नर्मदे हर… च्या जयघोष करीत कार्यक्रम संपन्न झाला.
श्री दत्त सेवा प्रतिष्ठान, रूपीनगर तर्फे सामाजिक कार्यकर्ते शिरीष भाऊ उत्तेकर यांनी आभार प्रदर्शन केले,श्री. योगेश कारंडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
