पिंपरी चिंचवड (दिनांक 24 डिसेंबर 2024) रोजी पिंपरी चिंचवड शहरांमधील आकुर्डी गणेश व्हिजन ठिकाणी कार्यरत असलेली अजिंक्य इंटरप्राईजेस या कंपनीने तिसाव्या वर्षामध्ये पदार्पण केले व 2025 साव्या वर्षात पदार्पण करत असताना थेरगाव या ठिकाणी कॅलेंडर चे अनावरण संसद रत्न मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी अजिंक्य इंटरप्राईजेस पिंपरी चिंचवडमध्ये कशा पध्दतीने कार्यरत आहे या संदर्भात गेल्या 30 वर्षाचा अनुभव सांगण्यात आला खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी अजिंक्य इंटरप्राईजेस ला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या त्यावेळी प्रमुख उपस्थितीत शिक्षण सभापती श्री धनंजय शेठ भालेकर ,भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ चंद्रकांत ऊदुगडे, गजानन आप्पा चिंचवडे आप्पासाहेब,श्री काशिनाथ बारणे साहेब,श्री अशोक कोकणे, बाळासाहेब देसाई,दत्तात्रय पारखी, राजाराम घाडगे,भानुदास पवार, सुनील वासनिक,अशोक कलाल, उपस्थित होते