Home पिंपरी चिंचवड दत्तजयंती निमित्त श्रीक्षेत्र रुपीनगर मध्ये भक्तांची मांदियाळी

दत्तजयंती निमित्त श्रीक्षेत्र रुपीनगर मध्ये भक्तांची मांदियाळी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

प्रतिनिधि
रुपीनगर परिसरातील दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे मिती मार्गशीष शुक्ल, शके १९४६ शनिवार दि.०७/१२/२४ ते रविवार १५/१२/२४ पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायण आयोजित केले होते.

रुपी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन कै. धोंडीराम थाळ्याप्पा कांबळे, तसेच सीमेवरील शहीद झालेल्या जवानांना, महत्त्वाच्या ज्ञात, अज्ञात सामाजिक,राजकीय साहित्य व कलाक्षेत्रातील व्यक्तीचे दुःखद निधन झाले त्या सर्वांना श्रीदत्तसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

दैनंदिन कार्यक्रममध्ये गुरुचरित्र पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महिला मंडळाचे भजन, हरिपाठ, तसेच महाराष्ट्रातील ख्यातनामक कीर्तनकार, ह.भ.प प्रणालीताई यादव, ह.भ.प रमेश महाराज ढमाळ, ह.भ.प कृष्णा महाराज पाटील, व काल्याचे किर्तन ह.भ.प चंद्रशेखर वारे महाराज यांचे कीर्तन रुपी ज्ञानामृत सेवेचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.

दत्त जयंती साप्ताहिक सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि गुरुचरित्र पारायण, पुष्पवृष्टी, भजन, कीर्तन, पालखी मिरवणूक, वारकरी संप्रदायातील फुगडी,पावली,खेळ विविध कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दत्त जयंतीला अमर्यादित भाविकांची दर्शनासाठी रांगा होत्या. यंदाही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

banner

यावेळी विविध क्षेत्रातील आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते SK. (बापू)भालेकर, यांनी उपस्थित राहून कार्यक्रमासाठी भरघोस मदत केली.
श्री दत्त सेवा प्रतिष्ठानचे, कार्यक्रमाचे आधारस्तंभ शिरीषभाऊ उत्तेकर, शामकांत (दादा) सातपुते, मा.गजाननशेठ वाघमोडे, अध्यक्ष श्री. नितीन बिरादार, उपाध्यक्ष विशाल खानेकर,कार्याध्यक्ष गणेश मगर, श्री. संदीप जाधव, सचिव श्री योगेश कारंडे यांच्या सहकार्याने दत्त जयंती सोहळा शिस्तबद्ध व शांतताप्रिय झाला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?