Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन…

महापालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन…

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि.२५ नोव्हेंबर २०२४ :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान यांसह केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अनेक पदेही भूषविले असून ते राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस,वल्लभनगर तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय उप अधिक्षक डाॅ.मनीषा क्षीरसागर,नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच रूग्णालयातील मेट्रन वत्सला वाजे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे,कर्मचारी महासंघाचे विशाल भुजबळ,यांसह सविता निगडे,स्वाती कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, कुंडलिक आमले, मोहन वाघमारे, बाळासाहेब पावशे, प्रेमकुमार रेवणा, शुध्दोधन भालेराव, निलेश बवले आदी कर्मचारी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?