Home पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभेत शंकर जगताप यांनी उडवला विजयाचा गुलाल

चिंचवड विधानसभेत शंकर जगताप यांनी उडवला विजयाचा गुलाल

कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत साजरा केला जल्लोष

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

चिंचवड

चिंचवडच्या विधानसभेत महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत झाली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर मुसंडी मारतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे.

चिंचवड विधानसभा निवडणूक ही पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे दिसून आले शंकर जगताप यांनी एकतर्फी विजय मिळवला. कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत भंडारा उधळत गुलाल उधळत उत्साह साजरा केला. चिंचवड विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रॅली काढली होती तरी देखील शंकर जगताप यांनी विजय खेचून आणला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?