Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून मे २०२६ अखेर ८८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून मे २०२६ अखेर ८८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान समारंभ उत्साहात संपन्न..

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक २९ मे २०२६)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेतून दिलेले योगदान संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, अशा शब्दांत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच यापुढे सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती वेतन आदेश व देय रकमेचा लाभ देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना केल्या.

महानगरपालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभात मे २०२६ अखेर नियत वयोमानानुसार ७२ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १६ अशा एकूण ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजर्डे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले,महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या कार्यकाळात जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा आयुष्यातील नवीन पर्व असतो. या काळात समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत आनंदी, समाधानकारक आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावे. तसेच कुटुंबीयांनीही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या योगदानाचा आदर करावा.

banner

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले,सेवानिवृत्ती ही केवळ शासकीय प्रक्रियेपुरती मर्यादित असते, मनातील सेवाभाव कधीही निवृत्त होत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर जपलेली लोकसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि अनुभव याचा लाभ पुढील पिढीला मिळावा. शहराच्या विकास प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुढेही योगदान द्यावे.

मे २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये सह शहर अभियंता माणिक चव्हाण, कार्यकारी अभियंता रविंद्र सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त राजीव घुले,राजाराम सरगर, मुख्याध्यापक बुधा नाडेकर, रामदास चपटे, बाळासाहेब आल्हाट,मुख्याध्यापक (प्राथमिक) पुष्पलता महाकाळ, अंजली झगडे, श्रीकांत चौगुले, सविता म्हस्के, सुनंदा शिंदे, भारती वर्णे, संगिता वाघमारे, प्रशासन अधिकारी ग्यानचंद भाट, सुचेता कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक महादेव बोरे, क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, रंगराव कारंडे, क्रीडा शिक्षक मंगल जाधव, स्टाफ नर्स उज्ज्वला जाधव, विद्युत पर्यवेक्षक अनिल नायर, फार्मासिस्ट शशिकांत रिटे, मुख्य लिपिक राजू वेताळ, उपशिक्षक संध्या गायकवाड, मिनाक्षी लोखंडे, केमिस्ट उमा भोगे, भांडारपाल प्रशांत आल्हाट, प्रयोगशाळा सहाय्यक केशव घाटगे, वीजतंत्री भगवान शिंगाडे, सुरक्षा सुपरवायझर धनाजी माळवदकर, जनरेटर ऑपरेटर अंकुश माळी, धनाजी गावडे, वायरमन हेमंत ढवळे, अनिल मोरे,आबा पाटील, हमीदसाहेब पटेल, प्लंबर गोरक्ष आगळे, वाहनचालक शांताराम घारे, इले. मोटार पंप ऑपरेटर हनुमंत घाडगे, दत्तात्रय तापकीर, वॉर्ड बॉय मोहनदास सर्वगोड, रखवालदार विठ्ठल निगडे,दिलीप गायकवाड, लक्ष्मण तिटकारे, लिफ्टमन शशिकांत शिंदे, आया संजीवनी पवार, नाईक नंदकुमार वाघेरे, बाळासाहेब इंगळे, शिपाई नितीन काळभोर, मजूर एकनाथ वांभिरे, सावकार भिवरे, चंद्रकांत मिरजकर, राजाराम लोंढे, बाबूराव चिंचवडे, बाळू साठे, रविंद्र कुदळे, नारायण केसवड, रमेश दोरगे, रमेश देवकाते, राजू आल्हाट, सफाई कामगार छाया थोरात,शशीकला पाटील, माणिक कांबळे, मुकुंद कोंढरे, मालन ओव्हाळ,सुधीर जगताप, धनंजय ओव्हाळ, सफाई सेवक देवराम पवार,विश्वनाथ बोऱ्हाडे, कचरा कुली दिलीप हनमंते आणि गटरकुली विजय जगताप यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्टाफ नर्स मीरा शिंदे, मुकादम विजय माछरे, सफाई कामगार प्रमिला जाधव, आशा लादे, रोशन मुजावर, सुमन ओव्हाळ,राजू लोंढे, बाजीराव कुटे, मालती वाघेरे, वैजयंती देवकर, लतिका बुट्टे, कचरा कुली मनोहर शितोळे महादेव तेलंगी, आणि विजयमाला कांबळे यांचा समावेश आहे.

या सन्मान सोहळ्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला तसेच महानगरपालिकेच्या विकासातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तानाजी नरळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?