Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान

पुरूषांप्रमाणे महिलांनाही शहरात इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून देऊ महापौर रवि लांडगे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

चिंचवड प्रतिनिधी दिनांक (२९ मार्च २०२६) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे ,उपमहापौर शर्मिला बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष सागर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पत्रकार संघ दरवर्षी घेत आहे.
यावेळी मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ मा. अध्यक्ष अनिल वडघुले, परिषद जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर, डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे, जिल्हा महिला समन्वयक रेखा भेगडे, समन्वयक मारुती बानेवार, महिला सरचिटणीस प्रज्ञा आबनावे तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडियाचे शिलेदार डिजिटल मिडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, महावीर जाधव, अशोक कोकणे, रमेश साठे, अनंता इंगळे, अविनाश कांबीकर, डॉ. देवीदास शेलार, पराग डिंगणकर, संजीव सूर्यवंशी, माऊली भोसले, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, राकेश पगारे, जेष्ठ सदस्य प्रकाश जमाले, किशोर लष्करे, नरेश जीनवाला,, विजय न्यायाधीश, राहुल जाधव, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
या सोहळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार – डॉ. किशोरी आपटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार – सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार – सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार – स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार – डॉ. पूजा बोंबले, पिंपरी चिंचवड संस्कारत्न पुरस्कार – भारतीय न्यायाधीश, पिंपरी चिंचवड कलारत्न – ज्योती भीमाशंकर सेतसंदी, पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार – कृत्तिका तुळसकर, आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला.
या बरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ महिला बचत गटांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमिला सुनील आढाव ( डेटा एन्ट्री विभाग) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आभार मानून – वाचन, अभ्यास, संशोधन ज्ञान, विज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्टर उभे केले जाणार असून या नवनिर्मितीत पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी उपलब्ध करून देणार असल्याच्या भावना महापौर रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केल्या.
आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान करता आला आणि महिलांसोबत विचारांची देवाणघेवाण करता आल्याचे, उप महापौर शर्मिलाताई बाबर यांनी समाधान व्यक्त केले. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद समाज हितासाठी, पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असताना परिषेदेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत महिला भगिनींचा केलेला सन्मान इतरांना प्रेरणादायी ठरत असल्याची भावना पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वडघुले, चिराग फुलसुंदर यांनी निवड समिती चे काम केले.तर लिटिल सायंटिस्ट चे दत्तात्रय गिरमकर, निलेश बोराडे, आणि काव्य मित्रचे राजेंद्र सगर उपस्थित होते. दरम्यान या सन्मान सोहळ्यामध्ये काव्य मैफिल संपन्न झाली. कवी प्रकाश गायकवाड, कवी देवेंद्र गावंडे, प्राध्यापिका कवयित्री सुषमा भालेराव यांनी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य संचालन राजेंद्र सगर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त योजित कर्तृत्ववान रणरागिणींच्या या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ होऊन महिलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी केले तर आभार परिषद कार्यकारिणी सदस्य व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ मा. अध्यक्ष अनिल वडघुले यांनी मानले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?